सोलापूरचे सांस्कृतिक वैभव

श्री हिराचंद नेमचंद वाचनालय

Main Building of Library




वाचनालय सभासदत्वाचे नियम


१) १८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस सभासद होता येईल.

२) केव्हाही सभासद झाल्यास त्या संपूर्ण महिन्याची वर्गणी भरावी लागते.

३) वर्गणी १० तारखेपर्यंत भरावी लागते.

४) तीन अगर त्याहून अधिक महिन्यांची वर्गणी थकल्यास ग्रंथ देणे बंद करणे / सभासदत्व रद्द करणे या विषयीचा मा.कार्यवाह यांना अधिकार राहील.

५) ओळखपत्र दाखल्याशिवाय पुस्तकाची देवघेव करता येणार नाही.

६) सभासदास नाव कमी करावयाचे असल्यास लेखी अर्ज आवश्यक आहे.

7) सभासदाच्या वर्गणीपोटी किंवा त्याच्याकडे असलेल्या पुस्तकाच्या किंमतीबद्दल वा सभासदत्व कमी केल्यापासुन चार महिन्यापर्यंत मागणी न केल्यास सभासदाची अनामत रक्कम वाचनालयाच्या खाती जमा केली जाईल.

८) सभासदाने काही महिने पुस्तकांची देव-घेव करुन पुढील काही महिने पुस्तकाची देव-घेव केली नाही. तर ज्या महिन्यात पुस्तकाची देव-घेव केली नाही त्या महिन्यांची फी सभासदाकडुन आकारली जाईल. काही महिन्यांसाठी पुस्तकांची देव-घेव करायची नसेल तर अगोदर वाचनालयाच्या सेवकांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे.

९) एका महिन्यात पुस्तक न आल्यास डिपॉझिटमधून कार्यकारिणी ठरवील त्याप्रमाणे दंड कापून घेण्यात येईल व डिपॉझिटची रक्कम पूर्ण करणा-यासच दुसरे पुस्तक मिळेल.

१०) एखाद्या नविन व्यक्तीस कोणतेही कारण न देता सभासदत्त्व नाकारण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास आहे.