श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाची वैशिष्ट्ये
 
     वाचनालयात  प्रथम आल्यावर वाचकांना आपली नोंदणी करावी लागते.त्यांना नाव व पत्ता लिहावा लागतो. त्याला सभासद होण्यासाठी पुस्तक , मासिक, बालविभाग याच्यासाठी वेगवेगळी वर्गणी आहे. 
तळमजला   -  इंग्रजी , हिन्दी ग्रंथसंग्रह कॉ.मीनाक्षी साने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेट मिळालेले अनमोल स्त्री वाड:मय
    
पहिला मजला   -   कवी कुंजविहारी दालन -
येथे पुस्तकांची देवघेव चालते 
वेळ स. ८.३० ते ११ व संध्या ५ ते ८ 
साप्ताहिक सुट्टी - बुधवार 
सर्व ग्रंथांचे संगणकीकरण झालेले आहे.
    
दुसरा मजला   :  महाकवी द.रा.बेंद्रे दालन 
संशोधन कक्ष : वेळ सकाळी ८.३० ते १२ संध्या ५ ते ८ ( वाचनालयाच्या सुट्या वगळून ) 
येथे विशेष अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ व नियतकालिके उपलब्ध आहेत. घरी न नेता येथेच बसून अभ्यासावी म्हणून संगणकासह सुसज्ज ,
    
    
 वाचनालयाच्या सभासदत्वाचे प्रकार
  
-       सर्वसाधारण सभासद 
-       नियतकालिकासाठी सभासद
-       बालविभाग सभासद
-       याशिवाय आजीव सभासदत्व: 
 कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने रु ५०० देऊन आजीव सदस्य होता येते. ही मुदत २० वर्षे असते.
| वर्गणीची माहिती | डिपॉझीट | प्रवेश फी | वर्गणी | 
| पुस्तकासाठी | ३००/- | ७०/- | ९०/- तीन महिन्याची वर्गणी सुरुवातीला | 
| मासिक नवा | ५०/- | - | २५/- | 
| मासिक जुना | २०/- | - | २०/- | 
| बाल विभाग | २०/- | - | ०५/- |