प्रा.श्रीराम पुजारी कलासंकुल
तळमजला :-
‚Áम्फी थिएटर :-
● व्याख्याने , नृत्यनाट्यादि सांस्कृतिक कार्यक्रम , शिबिरे इत्यादींसाठी उपलब्ध.
● २५० प्रेक्षकांसाठी खुर्च्यांची सोय- संपूर्ण वातानुकूलित व ध्वनिदोषमुक्त - LCD प्रोजेक्टरवर
● स्लाईडस् व फिल्मस् दाखवण्याची सोय.
उपलब्ध गोष्टी :-
● आवश्यक तर पंखे , स्पीकर , स्पॉट लाईटस् यांची सेवा.
● रंगमंच , स्वतंत्र दोन ग्रीनरुम्स
बुकींगसाठी संपर्क : कार्यवाह - ग्रंथपाल
● वेळ : सकाळी ८ ते १२ संध्या. ५ ते ८.३०
● भाडे : ३०००/- ,५००/- डिपॉझिट व LCD , Projector साठी १०००/- रुपये ,
प्रवेश शुल्क आकारल्यास ५००/- अतिरीक्त स्विकारले जातील.
सभागृहा विषयीचे नियम:
१) वाचनालयाचे सभागृह सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक समारंभासाठी देण्यात येईल.
२) एका वेळच्या ( ३ तासापर्यंतच्या ) कार्यक्रमासाठी खालील सेवाशुल्क घेण्यात येईल. तीनशे खुर्च्यासाठी रु.१०००/- तीन तासासाठी विद्युत पुरवठा रु. १०००/- ( जनरेटरसह ) साऊंड सिस्टीम व नेपथ्य व्यवस्था रु.५००/- एअरकुलिंग सिस्टीम चार्जेस रु. ५००/- ( वापरल्यास ) डिपॉझिट रु. ५०० असे एकून रु. ३५००/- संपुर्ण दिवस ( सकाळी ९ ते रात्री ९ ) पर्यंत १५०००/- सेवाशुल्क आकारण्यात येईल.
३) कार्यक्रम ३ तासापेक्षा जास्त वेळ चालल्यास पुढील ३० मिनिटानंतर पुढील तीन तासांचे सेवाशुल्क आकारले जाईल.
४) कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क आकारल्यास वरील शुल्कासह रु. ५००/- जादा आकारले जाईल.
५) सभागृहाची मांडणी , खुर्च्या लावणे , कार्यक्रमाच्या आधी व नंतरची स्वच्छता इ.करीता रु. १००/- वेगळे द्यावे. ही रक्कम सफाई कामगार घेतात. त्यामुळे शंभर रुपयाची पावती वाचनालय देणार नाही.
६) सभागृहातील लाईट शिवाय जादा लाईट वापरावयाची असल्यास त्याचे निराळे शुल्क द्यावे लागेल.
७) काही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाल्यास भरलेल्या रकमे मधुन ५००/- रुपये वजा केले जातील.
८) संस्थेसमोर कमानी लावायच्या असल्यास त्याची परवानगी घ्यावी लागेल. बॅनर लावता येतील.
९) ग्रंथालयाचे व वाचनालयाचे कामकाज चालू असते हे लक्षात ठेवून संयोजकांनी शांतता राहील याविषयी लक्ष द्यावे. ( ग्रंथालयाचे आवारात वाद्यवृंद / संगीत लावण्यास सक्त मनाई आहे.)
१०) वाचनालयाचा L.C.D प्रोजेक्टर वापरल्यास त्याचा चार्ज १०००/- रुपये तीन तासासाठी असेल.
११) कार्यक्रम हॉलमध्ये व वाचनालय परिसरात खाद्यपदार्थ बनविणे, जेवण वगैरे सर्व्ह करण्यास सक्त मनाई आहे. तसे निदर्शनास आल्यास डिपॉझिट जप्त केले जाईल.
१३) एखाद्या संस्थेला सभागृह देण्याचे / नाकारण्याचे अधिकार संस्थेला आहे.
१४) याशिवाय नियमात बदल करण्याचे अधिकार संस्थेने आपल्याकडे राखून ठेवले आहेत.
१५) पार्कींगची व्यवस्था उपलब्ध नाही याची नोंद घ्यावी.