श्री हिराचंद नेमचंद वाचनालय
१७ फेब्रुवारी १८५३ साली स्थापन झालेल्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच संकेतस्थळावर आपले मन:पूर्वक स्वागत आहे.
आपला लौकिक सा-या महाराष्ट्रात प्रस्थापित केला, त्यापैकीच एक आहे श्री हिराचंद नेमचंद वाचनालय. संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी खालीलप्रमाणे मेनू आहेत.
१)वाचनालय:
हा मेनू उघडून आपणास वाचनालयाचा इतिहास, वाचनालयाची वैशिष्ट्ये , ग्रंथ देवघेवीची पद्धत, सभासदत्वाचे प्रकार व नियम इत्यादि माहिती मिळेल. तसेच तेथेच दिवाळी अंकांची यादी पहावयास मिळेल.
2)संचालक मंडळ:
हा मेनू उघडल्यास आपणास सध्या असलेल्या संचालकांची नावे दिसतील.
3)श्रीराम पुजारी कलासंकुल: हा मेनू उघडताच तळमजला, पहीला मजला, दुसरा मजला अशी
तीन सदरे दिसतील. येथे कला संकुलाची सविस्तर माहिती व सभागृह भाड्याने देण्याचे नियम
पहावयास मिळतील.
४)छायाचित्रे:
हा मेनू उघडून आपण वाचनालयाची प्रत्यक्षदर्शी छायाचित्रे पाहू शकता.
५)संपर्क:
हा मेनू वापरून आपण आमच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.
वि. सू. : संकेतस्थळाचा वापर करा आणि संपर्क मेनू वापरून वाचनालयाविषयी सुधारणा सुचवा. संकेतस्थळाविषयी आपली मते जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वाचनालयाविषयी चार शब्द
दुर्मिळ आणि वैचारीक अशा ग्रंथाची उपब्लधी, मराठी विश्वकोशांचे खंड, समाज विज्ञान कोशाचे खंड, संस्कृती कोश, एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका असे संदर्भ ग्रंथ पाहण्याची मोफत व्यवस्था, विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वाचनालयाद्वारे आयोजन यामुळे या वाचनालयाचे सभासद असणे हा शहरवासियांच्या दृष्टीने अभिमानाचा व प्रतिष्ठेचा भाग आहे.
प्रबोधन करणारे व्यासपीठ : ग्रंथ देवघेव एवढ्यावरच कार्यकारी मंडळाने कधीच समाधान मानले नाही. शहरवासीयांच्या प्रबोधनासाठी आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नामांकीत वक्त्यांची व्याख्याने ऐकावयास मिळावीत म्हणून त्यांची व्याख्याने वेळोवेळी आयोजित केली जातात. आजपर्यंत कै. एस.एम. जोशी, दत्तो वामन पोतदार, बॅरिस्टर वि.म.तारंकुडे, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश वि.दे. तुळजापूरकर, डॉ. य.दि.फडके. प्रा.ग.प्र.प्रधान, समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. जमीर, डॉ. भि. कुलकर्णी अशा वक्तांची भाषणे आयोजित करण्यात आलेली आहेत. तसेच कविवर्य विं.दा.करंदीकर. नारायण सुर्वे, वसंत बापट व मंगेश पाडगावकरांसारख्या ख्यातनाम कवींच्या काव्यगायनाचे कार्यक्रम झालेले आहेत. व्याख्यानं, काव्य गायनाप्रमाणेच, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, डॉ. गंगूबाई हनगल, प्रभुदेव सरदार, प्रभा अत्रे, वसुंधरा कोमकळी गान सरस्वती किशोरताई आमोणकर, अशा सुप्रसिध्द गायक व गायिकांच्या गायनाच्या मैफिली वाचनालयात रंगलेल्या आहेत.
संगणकीकरण :
वाचकाला हवे असलेले पुस्तक वाचनालयात उपलब्ध आहे किंवा नाही ? ते कोणाकडे आहे ? केव्हा मिळू शकेल ? वगैरे माहीती त्वरीत मिळावी म्हणून पुस्तकांचे बारकोडीकरणाचे व संगणकीकरणाचे काम पुर्ण झालेले आहे. सहा संगणक नेटवर्कने जोडलेले असून इंटरनेटची सोय उपलब्ध आहे. सभासदांना ईमेलवरुन वाचनालयात नव्याने दाखल झालेल्या पुस्तकांची यादी उपलब्ध करुन दिली जाते.
कोणत्याही शहराच्या सांस्कृतिक उंचीचे मापन त्या शहरातील कार्यानुसार संस्था संघटनाच्या कार्यक्षमतेच्या कर्तव्यदक्ष व द्रष्ट्या मनुष्यबळाच्या आधारे केले जाते. एकोणिसाव्या शतकात म्हणजेच अव्वल आंग्लाईत सोलापूर शहराला चेहरा मोहरा प्राप्त करुन देणा-या आणि जनजागृती व जनसंघटन करुन प्रबोधनाची चळवळ रुजविणा-या अनेक संस्था स्थापन झाल्या. काही काळाच्या प्रवाहाबरोबर राहणा-या क्षमतेअभावी कायमच्या पडद्याआड गेल्या तर काहींनी आपला लौकिक सा-या महाराष्ट्रात प्रस्थापित केला आहे. त्यापैकी एक आहे श्री हिराचंद नेमचंद वाचनालय.
विचारप्रवर्तक ज्ञानसंपदा - स्थापनेपासून वाचनालयात हिंदुस्थानचा इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती यावरील ग्रंथतसेच महाकवी कालिदास , भवभुति , कौटिल्य इत्यादींचे अभिजात वाड् मय ग्रंथ , प्लेटो , ‚Áरिस्टॉटल , जॉन स्टुअर्ट मिल , जेरिमी बेथ्यम , कार्ल मार्क्स
, रसेल , बर्नाड शॉ अशा पाश्यात्य तत्ववेत्यांचे ग्रंथ ठेवण्यात आल्याने प्राचीन भारतीय परंपरे प्रमाणेच वाचकांना उदारमतवाद , समाजवाद , साम्यवाद,मानवतावाद या विचारसरणीचा परिचय होऊ शकला आणि स्वातंत्र्य , समता बंधुता , लोकशाही मानवता इत्यादी मुल्यांचे महत्त्व समजले. त्यामुळे तत्कालीन नेत्यांची एक वैचारिक मूस तयार झाली. त्यातून सोलापुरात राजकीय व सामजिक सुधारणांना नकळत प्रेरणा मिळत गेली.
संगीत विभाग : संगीत विभागात सध्या हिंदी, मराठी, गाण्याचा २५० रेकॉर्डस शास्त्रीय संगीताच्या १०० रेकॉर्डस, प्रभुदेव सरदारांच्या गायनाच्या ७५ रेकॉर्डस ठुमरी व दादराच्या ५० रेकॉर्डस व ५० सीडिज ठेवण्यात आलेल्या असून महिन्यातून किमान एकवेळा रसिक श्रोत्यांना मोफत ऐकवल्या जातात.
बालविभाग - लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यांच्या संवेदनशील मनावर सुसंस्कार व्हावेत म्हणून १९४८ पासून बालविभाग सुरु करण्यात आला आहे. त्यांना तेथे बसुन पुस्तके वाचता यावीत यासाठी सुसज्ज असा बालविभाग वेगवेगळ्या चित्रकृतींनी आकर्षक केलेला आहे. पुस्तक वाचनाचे महत्व लहानपणापासूनच समजावे यासाठी ९ ते १५ वयोगटातील मुला मुलींसाठी ' आस्था ' या संस्थेच्या मदतीने ५ दिवसांच्या वाचन कार्यशाळेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांमध्ये नाट्य गुणांची जोपासना व्हावी यासाठी १५ दिवसांचे नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते.
भावी योजना - सोलापूर शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेऊन वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने जुळे सोलापूर येथे एक शाखा सुरु करण्याचा विचार केला आहे. तसेच वाचनालयापासून दुर राहणा-या सभासदांनी पुस्तकाची मागणी फोनद्वारे नोंदविल्यास पुस्तके घरपोच देण्याचा मानस आहे. लिफ्टची सोय केल्यामुळे सध्या असलेल्या वा.का. किर्लोस्कर सभागृहाचे नूतनीकरण करुन ते वातानुकूलीत करण्याची योजना आखली आहे.वाचनालयाची वेबसाईट (संकेतस्थळ) आहे.